कोरोना व्हायरस आणि आपले आरोग्य
चीन देशातील वुहान प्रांतातून
सुरुवात झालेल्या या आजाराने जगभरात कसे थैमान घातले आहे,याची
सर्वांनाच जाणीव आहे. पहीला रुग्ण
सापडून एका महिन्याच्या आतच जगभर याचा प्रसार झाला. आरोग्याच्या सुविधांनी
प्रगत
असणार्या देशांना सुद्धा याचा प्रसार थांबवता आला नाही. जगभर भीतीचे सावट पसरले.
भारत हा जगातील लोकसंखेच्या
बाबतीत दुसर्या क्रमकांचा देश. अशा देशात हा आजार किती भयानक रूप घेऊ शकतो ही
कल्पनाही किती भयावह आहे.अगदी सुरुवातीपासूनच यावर आपले प्रशासन दक्ष आहे.
त्यामुळे योग्य त्या उपाययोजना
करून आपण या कोरोना विरुद्धच्या लढाईत जिंकू याचा
मला विश्वास वाटतो.
सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आणि
त्याची अमलबजावणी काटेकोरपणे चालू झाली. प्रसार
माध्यमातून मिळाले
ल्या बातमीनुसार
काही ठिकाणी तणावाची परिस्थिची निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात मर्यादित असलेली
रुग्णांची
संख्या वाढत गेली. लॉकडाऊनचा कालावधीही वाढला.
एक देशाचा जबाबदार नागरिक म्हणून
या आजारापासून स्वत:चे रक्षण कसे करावे याची माहिती
आपणास घेऊन त्याप्रमाणे आचरण
करणे काळाची गरज बनली आहे.
कोरोंनाची लक्षणे –
कोरोंना तुमच्या थेट फुप्फुसांवर हल्ला करतो.
यामुळे तुमच्यादोनपैकी एक लक्षण दिसू लागत- एक तर
ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी
काहीही झालं तरी श्वाश घेण्यास त्रास होऊ लागतो.
लक्षणे-
●डोकेदूखी सुरक्षित कसे
रहावे.
●खोकला किंवा
घसा खवखवणे. ●आजारी व्यक्तीच्या फार जवळ जाऊ नका.
●श्वाश
घेण्यास त्रास. ●हात न धुता तोंड, नाक,डोळे,कान यांना स्पर्श करू नका.
रुमालचा वापर करावा.
●स्नायूंमध्ये
दुखणे. ●साबणाने, हँडवॉशने नियमित हात धुवावा.
●चव न कळणे
किंवा वास येणे. ●अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जाताना मास्कचा वापरा.
याची लक्षणे दिसायला कधीकधी पाच
दिवसलागू शकतात तर कधीत्याहून जास्त WHOनुसार हा व्हायरस
आपले परिणाम तुमच्या
शरीरात दाखवण्यास १४ दिवससुद्धा घेऊ शकतो. हाच इनक्यूबेशन पिरियड होय.
जगभरातील रुग्णांचा अभ्यास केला असता लहान
मुले व वयोवृद्ध लोकांना हा आजार जास्त घातक आहे. ज्या
व्यक्ती दमा,मधुमेह, उच्च रक्तदाब
अशा आजारानी ग्रस्त आहेत, आशांना देखील हा आजार घातक आहे. या
आजारावर
जोपर्यंत प्रभावी औषध सापडत नाही, तोपर्यंत आपण आपली
काळजी घेतलेली बरी. गर्दीच्या ठिकानी न जाणे, सर्दी, ताप
असल्यास डॉक्टराचा सल्ला घ्यावा. आपली प्रतिकार शक्ती वाढवा.
या संकटाच्या काळात आपली काळजी आपणच घ्या.
सचिन आनंदराव रोडेस(सहा. शिक्षक)
शिरटी हायस्कूल, शिरटी
No comments:
Post a Comment